नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार रुपये.
namo shetkari maha sanman nidhi |
मित्रांनो
पी एम किसान सन्माननिधी (PmKisan Samman Nidhi) प्रमाणे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच
महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना आता पीएम किसान चे सहा हजार आणि नमो शेतकरी
सन्मान निधीचे सहा हजार असे मिळून वार्षिक 12 हजार
रुपये मिळणार आहेत. तर नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना काय आहे -Namo
Shetkari MahaSanman Nidhi Yojana? याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र
असतील आणि यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती
आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो
तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रातील जास्त जनता ही शेतीवर अवलंबून आहे. आणि
सध्या शेती हे नफ्याची राहिलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा आर्थिक
टंचाईत असतो हेच लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत
करण्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी ही
योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा
हजार रुपये आधार लिंक बँक खात्यामध्ये देणार आहेत.
नमो
शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 1.5
शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. जर तुम्ही एक शेतकरी असाल तर नमो शेतकरी
सन्मान निधी मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे. यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट
लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आणि या लेखामध्ये देणार आहोत.
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana काय आहे?
नमो
शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 ची घोषणा 2023-24
या वर्षाच्या अर्थसंकल्पांतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी 9 मार्च रोजी केली आहे. पंतप्रधान किसान
सन्मानच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी
योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष ₹ 6000 च्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल, ही आर्थिक मदत
रक्कम शेतकऱ्यांना तीन सन्मान हप्त्यांमध्ये दिली जाईल किंवा आर्थिक मदतीची रक्कम
थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
किसान
सन्मान निधी योजनेंतर्गत, केंद्र सरकारकडून ₹6000
आणि महाराष्ट्र
सरकारकडून ₹6000, असे
मिळून एकूण दरवर्षी ₹12000 ची आर्थिक मदत शेतीसाठी दिली जाईल. या योजनेअंतर्गत, सरकारने 6900 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली आहे.
राज्यातील 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महा
सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :
§ शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
§ शेतकरी प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी नसावा.
§ दिनांक ०१/०२/२०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.
§ पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी
लिंक करणे बंधनकारक आहे.
§ पीएम किसान सन्मान निधी मध्ये KYC पूर्ण केलेली असावी.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी लागणारी आवश्यक
कागदपत्रे : Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Required
Document
1.आधार कार्ड
2.बँक पासबुक
3.मोबाईल नंबर
4.जमिनीचा सातबारा व आठ अ
5. रेशन कार्ड
6. आणि सर्वात महत्त्वाची बँक
खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे.
हे हि वाचा :
· जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
· महात्माज्योतिबा फुले कर्जमाफी योजना
· उत्पनाचा दाखला कसा काढावा
· महा-ई सेवा केंद्र Registration
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Registration:
नमो
शेतकरी महासन्मान निधि योजनेमध्ये सामिल होण्यासाठी काय करावे लागेल? : Namo
Shetkari MahaSanman Nidhi योजनेचे Registration कुठे करावे लागेल? असे बहुसंख्य
प्रश्न शेतकऱ्यांना मनात आहेत.
ज्या शेतकऱ्यांना PM-KISAN
पंतप्रधान किसान सन्मान निधिया
योजनेचे पैसे खात्यावर येत आहेत त्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये नव्याने
रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. त्यांना पी एम किसान प्रमाणे त्यांच्या आधार
सलग्न बँक खात्यावर पैसे मिळणार आहेत.
म्हणजेच ज्या वेळेस पी एम किसान चे दोन हजार रुपये
शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजनाचेही पैसे त्याच
खात्यावर येथील.म्हणजे चार महिन्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार हजार रुपये
खात्यावर जमा केले जातील. वर्षभरात बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग
केली जातील.ज्यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकारचे आणि सहा हजार रुपये
महाराष्ट्र राज्य सरकारचे असतील.
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana कधी होईल पहिला हफ्ता जमा :
नमो शेतकरी किसान सन्मान योजनाचा पहिला हप्ता मे किंवा जून
महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची
केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावी जर केवायसी
पूर्ण केली नाही तर नमो शेतकरी सन्मान निधीचेही पैसे जमा होणार नाहीत.
Namo shetkari yojana apply online: नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज
या योजनेसाठी अद्याप कुठलेही ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक किंवा योजनेचा अर्ज उपलब्ध झालेला नाही. जर या योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय लिंक आली तर आम्ही आमच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करू तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज उपलब्ध करून देऊ.
नमो शेतकरी योजना महाराष्ट्र : नमो शेतकरी योजना 2023
योजनेचे
नाव : नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना |
राज्य : महाराष्ट्र |
उद्देश : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे |
अधिकृत वेबसाइट : |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना रु.6000 थेट लाभ ©www.hindimeearn.com |
लाभार्थी : राज्यातील शेतकरी |
Conclusion:
नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अश्याच update साठी आमच्या टेलीग्राम चैनल ला ज्वाइन करू सकता.
0 Comments: