Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Link -माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वांना पडणारे प्रश्न

 

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वांना पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे -

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Application Online Apply

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp: 

Telegram Channel Link :  https://t.me/marathitechmitra


नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज भरत असताना खूप साऱ्या लोकांना अडचणीत आहेत त्यांना प्रश्न पडत आहेत.त्याच प्रश्नांची उत्तरे आपण यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तुमचा हे प्रश्न यामध्ये असेल त्याचे उत्तर तुम्ही पाहून घ्या आणि नंतरच अर्ज भरा.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

 

सर्वप्रथम तुम्हाला खालील प्रमाणे अर्ज भरून घ्यायचा आहे:

 

महिलेचे संपूर्ण नाव: आधार कार्ड प्रमाणे टाईप करा.

 

त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव टाईप करा.


महिलेचे लग्न पूर्वीचे नाव कंपल्सरी नाही ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांनी टाकू नका ज्यांची झालेले आहेत त्यांनीच फक्त टाका.

अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती:

अर्जदाराचा संपूर्ण पत्ता

मध्ये मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा टाका. जसे मू.पो.,ता.,जी._


 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

त्याखाली आधार कार्ड प्रमाणे पत्ता निवडा. जिल्हा,गाव,ग्रामपंचायत,पिनकोड हा आता आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे.

मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर महिलेचा टाका.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

महिलेच्या जन्म परप्रांतीयात झाला आहे का आता तुम्हाला महाराष्ट्र राज्या व्यतिरिक्त दुसरे राज्य निवड करता येतील एप्लीकेशन अपडेट करून घ्या.


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


 

बँकेची पूर्ण माहिती टाका

बँकेचे नाव आयएफसी कोड, बँक अकाउंट होल्डर चे नाव.

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे सिलेक्ट करा.

 

महिलेचा जन्म पर राज्यात झालेला असेल तर तिच्या नवऱ्याचे कागदपत्रे अपलोड करा.

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि हमीपत्र disclaimer टिकमार्क करून तुम्ही अर्ज सबमिट करा.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

 

1.एकदा फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये सध्या दुरुस्ती नाही त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या.

 

2.फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 1MB  पेक्षा कमी असावी. आणि डॉक्युमेंट फक्त JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करायचे आहेत.

 

3.नारीशक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून, किंवा संध्याकाळी अकरा बारा वाजता फॉर्म भरा लगेच सबमिट होतो, लाखो जन फॉर्म भरत आहेत त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार.

 

4.फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज मध्ये तुमचे स्टेटस चेक करू शकता.

 

5.काही जणांनी जुने एप्लीकेशन म्हणजे अपडेट होण्याअगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही.

 

6.एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही.

 

7.पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखवा असावा.

 

8.लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका.

 

9.एका मोबाईल नंबर वरून एकच अर्ज भरा दुसरा अर्ज भरायचा असेल तर नवीन मोबाईल नंबर टाकून अर्ज करा.

 

10.बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते नॅशनलाईज बँकेचे असावे. तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्ड ला बँक लिंक असणे गरजेचे आहे.

 

12.सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. यामध्ये बदल असल्यास शक्यतो दुरुस्त करून घ्या.

 

13.आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा. दोन्ही साईड एका पेजवर कशा घ्यायच्या याबद्दलचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर आहे तिथून पाहून घ्या.

 

14. सध्यातरी फॉर्म भरायची ऑनलाईन वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता.

 

15.ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा. त्यासाठी दुसरा फॉर्म उपलब्ध आहे.

 

16.सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा.

 

17.नवीन अपडेट झालेल्या एप्लीकेशन मध्ये तुम्ही 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलेचे फॉर्म भरू शकता.

 

18.नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर, पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही.

 

19.डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर नाही.

 

20.रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा.

 

21.पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल.

 

22.ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाही

 

23.जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा. कारण पैसे डीबीटी मार्फत येणार आहेत.

 

24.जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तर तुम्हाला तो कुठेही सबमिट करायचा नाही आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाइन भरून दिला तर तुम्हाला ऑनलाईन करण्याची गरज नाही त्या करतील.

 

25.पोस्टाचे अकाउंट देत असाल तर फक्त IPPB Digital Account चालेल.

 

26.फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा. आम्ही हमीपत्राची लिंक टेलिग्राम चैनल वर देण्यात आलेली आहे.

 

 

27.अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी सध्यातरी एडिट ऑप्शन नाही एडिट ऑप्शन आल्यास कळवले जाईल.

 

28.शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार म्हणजे माहेरच्या नावाने आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही.त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष चा अगोदर असावा.

 

29.शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार वरील डेट ऑफ बर्थ वेगवेगळी आहे. तर मग आधार कार्ड वर डेट ऑफ बर्थ टाकून दुसरा पुरावा जसे मतदान कार्ड टाका.

 

30.रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे, आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे

 

31.सध्या तरी CSC Vle यांना यासाठी कोणतेही मानधन देण्यात येणार नाही.

 

32.डॉक्युमेंट्स ओरिजनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तरी चालेल.

 

33.संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही.

 

34.हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिकाण टाका. नंतर त्याचा फोटो काढा किंवा स्कॅन करून अपलोड करा.

 

35.रोज नारी शक्ती दूत Application Update होत आहे. त्यामुळे घाई करू नका.यामधील ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त केल्या जातील. योजनेसाठी 31 ऑगस्ट २०२४ हि अंतिम तारीख आहे त्यामुळे घाई करू नका.

 

मराठी टेक मित्र Join telegram Group - https://t.me/marathitechmitra


 

Latest
Next Post

Completed Master Degree in Computer Science.Passionate about Blogging,Make Money and Web-Designing.Best Knowledge of HTML,PHP,.NET,C,C++ and other programming languages. Know More About Me...

Related Posts

0 Comments: