Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana -मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात - Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.


२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.


३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.


४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.


५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.


६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.


७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४

दरमहा 1500 रु लाभ सुरु होईल.

वय : 21 वर्ष ते 65 वर्ष

अधिवास प्रमाणपत्र:

अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षा पुर्वीचे खालील चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र/ओळखपत्र

1.रेशनकार्ड

2.मतदान कार्ड

3.जन्म दाखला

4.शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)

2.5 लाख रु उत्पन दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे

1.पिवळे रेशनकार्ड

2.केशरी रेशनकार्ड  या पैकी एक पुरावा

लागणारी कागदपत्रे

स्वत: महिला फोटो घेन्या साठी

1. महिलेचे आधार कार्ड

2. रेशनकार्ड / मतदान कार्ड /जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) यापैकी एक

3. महिलेचे बँक पासबुक (आधार लिंक)

4. कुटुंब रेशनकार्ड (पिवळे, केशरी )

5.अर्जदार हमीपत्र

 

Previous Post
Next Post

Completed Master Degree in Computer Science.Passionate about Blogging,Make Money and Web-Designing.Best Knowledge of HTML,PHP,.NET,C,C++ and other programming languages. Know More About Me...

Related Posts

0 Comments: