Mix Crop ratio Calculator Pmfby : पीकविमा मिक्स पिकविमा गुणोत्तर कॅल्क्युलेटर

Mix Crop ratio Calculator Pmfby


Mix Crop ratio Calculator Pmfby



पिकविमा योजना: शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार! 

 🔹 पिकविमा म्हणजे काय? 

 पिकविमा योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे निसर्गामुळे होणारे नुकसान भरून निघण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदत. 
पावसाचा अभाव, अतिवृष्टी, गारपीट, पूर, किडीचा प्रादुर्भाव, आगीमुळे होणारे नुकसान यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. 

 🎯 योजनेचा उद्देश शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढणे शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक ताण न येऊ देणे शेतीमध्ये स्थिरता आणि आत्मविश्वास वाढवणे.

 📌 पिकविमा अंतर्गत समाविष्ट आपत्ती 
 ✅ नैसर्गिक आपत्ती: अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ गारपीट पूर 
 ✅ जैविक आपत्ती: कीड/रोगराईचा प्रादुर्भाव प्राण्यांनी केलेले नुकसान (कधी कधी)
 

मिक्स पिकविमा गुणोत्तर Calculator

मिक्स पिकविमा गुणोत्तर कॅल्क्युलेटर






🧪 वापर कसा करायचा: 
 1. एकूण क्षेत्रफळ → मॅन्युअली टाका (उदा. 0.79, 1.25) 
 2. १ ले पिक → आवश्यक आहे 
 3. २ रे/३रे पिक टाकले नाही तरी चालते (0 धरले जाईल) 
 4. योग्य गुणोत्तर आणि त्रुटी मेसेज लगेच दिसेल

Agristack Maharashtra Farmer Registration - Agristack Farmer Resigtry Maharashtsra

Agristack Maharashtra Farmer Registration
Agristack Maharashtra Farmer Registration | Agristack MHFR @mhfr.agristack.gov.in Portal

Agristack Yojan (अग्रीस्टॅक योजना) ही एक महत्वाची शेतकरी विकसनाशी संबंधित योजना आहे, जी भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लेटफॉर्मवर आधारित एक प्रणाली तयार करण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी गोळा करून, त्यांना विविध सरकारी योजना, सहाय्यता, माहिती, आणि इतर सर्व शेतकरीविषयक सेवा डिजिटल रूपात उपलब्ध करून देणे.


Agristack Maharashtra Farmer Registration


 

Agristack Yojana चा उद्देश:

1. शेतकऱ्यांची माहिती डिजिटली संग्रहित करणे: योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या सर्व संबंधित माहितीचा (जसे की शेताची आकार, लागवडीचे प्रकार, उत्पादन क्षमता इत्यादी) डेटा एकाच ठिकाणी संग्रहित केला जाईल.

 

2. डिजिटल सेवांचा वापर: शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सरकारी योजना, कृषीविषयक मार्गदर्शन, बियाणे, खत, पाणी व्यवस्थापन, कर्ज सुविधा इत्यादी सर्व सेवा मिळवता येतील.

 

3. कृषी तंत्रज्ञानाचा वापर: नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुधारणा करणे.

 

4. सुलभ माहितीचा प्रसार: शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य माहिती मिळावी, ज्यामुळे ते आपल्या शेतीच्या कामकाजात सुधारणा करू शकतील.

 

Agristack Yojana चा फायदे:

- शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होईल.

- कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून उत्पादन क्षमता वाढवता येईल.

- शेतकऱ्यांची वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी कर्ज आणि इतर सहाय्यता मिळवणे सोपे होईल.

- डिजिटल पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत आणि मार्गदर्शन मिळू शकेल.

 

या योजनेच्या माध्यमातून भारतातील कृषी क्षेत्रात सुधारणा होईल, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर शिकवला जाईल, आणि शेती उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवण्यास मदत होईल.

 

Agristack Yojana registration Through CSC Maharashtra

महाराष्ट्रातील अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी सीएससी द्वारे तुम्ही नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला खालील स्टेप follow कराव्या लागतील.

 

१. सीएससी केंद्राला भेट द्या:

तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) शोधा. ही सरकार-अधिकृत केंद्रे आहेत जी नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा प्रदान करतात.

 

२. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा:

आधार कार्ड

जमिनीच्या मालकीचा पुरावा (उदा. जमिनीच्या नोंदी 7/12 , ८अ)

आधार कार्ड शी लिंक असलेला mobile नंबर.

 

Step 1 :

खाली दिलेल्या website वर visit करा.Login with CSC या पर्यायवर क्लीक करा. तुमचा CSC id व password टाकुन login करा.

https://mhfr.agristack.gov.in/

 

Step 2 :

शेतकरायचा आधार नंबर टाका. आधार वर otp येईल तो वेरीफाय करून घ्या. परत contact number verify करून घ्या.

 

Step 3:

Residential Address टाकुन घ्या. गाव, तालुका, जिल्हा, पिन code.

 

 

Step 4:

शेतकऱ्याची 7/12 details verify करून add करून घ्या. शेतकऱ्याकडे एकूण किती गावामध्ये जमीन आहे तेवढी जमीन add करून verify करून घ्या.

 

Step 5 :

सर्व अटी  व शर्ती मान्य आहेत याला tick मार्क करा. परत आधार esign verification करून घ्या.

 

Step 6 :

आधार esign verification तुम्हाला एक registration number मिळेल. ऑपरेटरने तुम्हाला पावती किंवा नोंदणी क्रमांक द्यावा. भविष्यातील संदर्भासाठी हे ठेवा.

 

अशा प्रकारे तुम्ही csc च्या माध्यमातून agristack farmer id card काढू शकता.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Link -माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वांना पडणारे प्रश्न

 

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वांना पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे -

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Application Online Apply

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp: 

Telegram Channel Link :  https://t.me/marathitechmitra


नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज भरत असताना खूप साऱ्या लोकांना अडचणीत आहेत त्यांना प्रश्न पडत आहेत.त्याच प्रश्नांची उत्तरे आपण यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तुमचा हे प्रश्न यामध्ये असेल त्याचे उत्तर तुम्ही पाहून घ्या आणि नंतरच अर्ज भरा.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

 

सर्वप्रथम तुम्हाला खालील प्रमाणे अर्ज भरून घ्यायचा आहे:

 

महिलेचे संपूर्ण नाव: आधार कार्ड प्रमाणे टाईप करा.

 

त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव टाईप करा.


महिलेचे लग्न पूर्वीचे नाव कंपल्सरी नाही ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांनी टाकू नका ज्यांची झालेले आहेत त्यांनीच फक्त टाका.

अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती:

अर्जदाराचा संपूर्ण पत्ता

मध्ये मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा टाका. जसे मू.पो.,ता.,जी._


 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

त्याखाली आधार कार्ड प्रमाणे पत्ता निवडा. जिल्हा,गाव,ग्रामपंचायत,पिनकोड हा आता आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे.

मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर महिलेचा टाका.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

महिलेच्या जन्म परप्रांतीयात झाला आहे का आता तुम्हाला महाराष्ट्र राज्या व्यतिरिक्त दुसरे राज्य निवड करता येतील एप्लीकेशन अपडेट करून घ्या.


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


 

बँकेची पूर्ण माहिती टाका

बँकेचे नाव आयएफसी कोड, बँक अकाउंट होल्डर चे नाव.

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे सिलेक्ट करा.

 

महिलेचा जन्म पर राज्यात झालेला असेल तर तिच्या नवऱ्याचे कागदपत्रे अपलोड करा.

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि हमीपत्र disclaimer टिकमार्क करून तुम्ही अर्ज सबमिट करा.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

 

1.एकदा फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये सध्या दुरुस्ती नाही त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या.

 

2.फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 1MB  पेक्षा कमी असावी. आणि डॉक्युमेंट फक्त JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करायचे आहेत.

 

3.नारीशक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून, किंवा संध्याकाळी अकरा बारा वाजता फॉर्म भरा लगेच सबमिट होतो, लाखो जन फॉर्म भरत आहेत त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार.

 

4.फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज मध्ये तुमचे स्टेटस चेक करू शकता.

 

5.काही जणांनी जुने एप्लीकेशन म्हणजे अपडेट होण्याअगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही.

 

6.एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही.

 

7.पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखवा असावा.

 

8.लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका.

 

9.एका मोबाईल नंबर वरून एकच अर्ज भरा दुसरा अर्ज भरायचा असेल तर नवीन मोबाईल नंबर टाकून अर्ज करा.

 

10.बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते नॅशनलाईज बँकेचे असावे. तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्ड ला बँक लिंक असणे गरजेचे आहे.

 

12.सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. यामध्ये बदल असल्यास शक्यतो दुरुस्त करून घ्या.

 

13.आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा. दोन्ही साईड एका पेजवर कशा घ्यायच्या याबद्दलचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर आहे तिथून पाहून घ्या.

 

14. सध्यातरी फॉर्म भरायची ऑनलाईन वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता.

 

15.ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा. त्यासाठी दुसरा फॉर्म उपलब्ध आहे.

 

16.सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा.

 

17.नवीन अपडेट झालेल्या एप्लीकेशन मध्ये तुम्ही 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलेचे फॉर्म भरू शकता.

 

18.नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर, पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही.

 

19.डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर नाही.

 

20.रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा.

 

21.पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल.

 

22.ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाही

 

23.जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा. कारण पैसे डीबीटी मार्फत येणार आहेत.

 

24.जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तर तुम्हाला तो कुठेही सबमिट करायचा नाही आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाइन भरून दिला तर तुम्हाला ऑनलाईन करण्याची गरज नाही त्या करतील.

 

25.पोस्टाचे अकाउंट देत असाल तर फक्त IPPB Digital Account चालेल.

 

26.फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा. आम्ही हमीपत्राची लिंक टेलिग्राम चैनल वर देण्यात आलेली आहे.

 

 

27.अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी सध्यातरी एडिट ऑप्शन नाही एडिट ऑप्शन आल्यास कळवले जाईल.

 

28.शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार म्हणजे माहेरच्या नावाने आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही.त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष चा अगोदर असावा.

 

29.शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार वरील डेट ऑफ बर्थ वेगवेगळी आहे. तर मग आधार कार्ड वर डेट ऑफ बर्थ टाकून दुसरा पुरावा जसे मतदान कार्ड टाका.

 

30.रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे, आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे

 

31.सध्या तरी CSC Vle यांना यासाठी कोणतेही मानधन देण्यात येणार नाही.

 

32.डॉक्युमेंट्स ओरिजनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तरी चालेल.

 

33.संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही.

 

34.हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिकाण टाका. नंतर त्याचा फोटो काढा किंवा स्कॅन करून अपलोड करा.

 

35.रोज नारी शक्ती दूत Application Update होत आहे. त्यामुळे घाई करू नका.यामधील ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त केल्या जातील. योजनेसाठी 31 ऑगस्ट २०२४ हि अंतिम तारीख आहे त्यामुळे घाई करू नका.

 

मराठी टेक मित्र Join telegram Group - https://t.me/marathitechmitra


 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana -मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात - Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana


१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.


२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.


३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.


४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.


५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.


६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.


७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४

दरमहा 1500 रु लाभ सुरु होईल.

वय : 21 वर्ष ते 65 वर्ष

अधिवास प्रमाणपत्र:

अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षा पुर्वीचे खालील चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र/ओळखपत्र

1.रेशनकार्ड

2.मतदान कार्ड

3.जन्म दाखला

4.शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)

2.5 लाख रु उत्पन दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे

1.पिवळे रेशनकार्ड

2.केशरी रेशनकार्ड  या पैकी एक पुरावा

लागणारी कागदपत्रे

स्वत: महिला फोटो घेन्या साठी

1. महिलेचे आधार कार्ड

2. रेशनकार्ड / मतदान कार्ड /जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) यापैकी एक

3. महिलेचे बँक पासबुक (आधार लिंक)

4. कुटुंब रेशनकार्ड (पिवळे, केशरी )

5.अर्जदार हमीपत्र

 

ITI क्या है? आई.टी.आई. कोर्स की जानकारी

 ITI Kya Hai, ITI Course के बारे में हम जानकरी लेने वाले है. ITI Ka Full form क्या होता है ? आईटीआई क्या है? इसमें कोन कोन से ट्रेड होते है.

ITI Kya Hai
 ITI Kya Hai

अभी आपने 10th की बोर्ड की exam पास की होगी. उसमे कई लोगो को अच्छे अंक प्राप्त हो गए है. तो कई लोगो को बहुत कम मार्क्स मिले है. तो उन लोगो को घबराने की कोई जरुरत नहीं, क्यों की अगर आपको कही पर एडमिशन नहीं मिल रहा है तो ITI आपके लिए एक अच्छा कोर्स है.

ITI कोर्स खास उन लोगो के लिए डिजाईन किया गया है जिन को तुरंत जॉब करना है, अपने पैरो पर खड़ा रहना है.

आईटीआई का प्रमुख हेतु है, technical manpower को train कर के industry को provide करना.


ITI Ka Full Form ITI Kya Hai: ITI Full Form in Hindi

ITI का फुल फॉर्म - Industrial Training Institutes- औद्योगिक प्रशिक्षण संस्थान 

ये संस्था एसे कोर्स डिजाईन करती है, जिससे युवाओ को जॉब मिल सके.


ITI Course Ki Puri Jankari

आईटीआई में अलग अलग प्रकार के ट्रेड होते. आईटीआई के गवर्नमेंट, प्राइवेट कॉलेज मौजूद है. तथा कई यूनिवर्सिटी भी इस प्रकार के कोर्स प्रोवाइड करती है.

आईटीआई के अलग अलग कोर्स/ट्रेड होते है, जो 6 month, 1 year , 2 year के होते है.

अगर 10th पास किया है तो ITI को एडमिशन मील जाएगा.  कई एस भी है जिनको 8th पास पर भी एडमिशन मिलता है.

12th Pass out वाले स्टूडेंट भी इसके लिए एडमिशन ले सकते है.


आईटीआई के लिए फीस कितनी होगी:

अगर आपको गवर्नमेंट कॉलेज को एडमिशन मिल जाता है तो कोई फीस नहीं देनी होगी, लेकिन अगर आप प्राइवेट कॉलेज में करना चाहते है तो वहा फीस देनी होगी.


ITI Course/Trade

आईटीआई में अलग अलग ट्रेड और कोर्स है , जिनमे से कुछ के नाम निचे दिए गए है.

Fitters – फिटर

Electronic Mechanic – इलेक्ट्रॉनिक मैकेनिक

Electrician – इलेक्ट्रीशियन

C.O.P.A – Computer Operating & Programming Assistant.

Draftsman – ड्राफ्ट्समैन

AutoCAD – ऑटो कैड

Welder – वेल्डर

Plumber – प्लम्बर

Stenography (English, Hindi) – स्टेनोग्राफी

Mechanic Motor Vehicle (MMV) – मैकेनिक मोटर व्हीकल


एडमिशन कब और कैसे मिलेगा:

अगर आप गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन लेने चाहते है तो उसके लिए ऑनलाइन अप्लाई करना होता है. इसके एडमिशन 10th की exam का रिजल्ट लगने के बाद शुरू होते है.अप्लाई करने के लिए आपको पहले अपने वेबसाइट पर जाकर फॉर्म फिल करना होगा. उसके बाद merit list डिस्प्ले की जाएगी, अगर उसमे आपका नाम है तो आपको डॉक्यूमेंट लेकर उस कॉलेज में जाना है और एडमिशन लेना है.

अगर आपका नाम फर्स्ट मेरिट लिस्ट में नहीं है तो आप दूसरी लिस्ट का वेट करे. आपका नंबर गवर्नमेंट कॉलेज में नहीं लगता है तो आप किसी अच्छे प्राइवेट कॉलेज में भी अप्लाई कर सकते है.


ITI Ke Baad Kya Karna Chahiye

आईटीआई करने के बाद हम अपना खुद का बिज़नस शुरू कर सकते है. अपनी शॉप, दूकान शुरू कर सकते है जिस फील्ड में आपने कोर्स किया है उससे जुडी. प्राइवेट, गवर्नमेंट कंपनी में जॉब के लिए अप्लाई कर सकते है.


आईटीआई से जुड़े कुछ सवाल- जवाब:

10 वी के बाद मेरा गैप है तो क्या मुझे एडमिशन मिल सकता है.

- हा जरुर मिलेगा.


गवर्नमेंट कॉलेज में फीस भरनी होती है क्या?

- नहीं सिर्फ आपको exam फीस देनी होती है, और किसी भी प्रकार की फीस नहीं देनी होगी.


10th Fail हु क्या मुझे एडमिशन मिलेगा.

- आप 8 th पास पर जो कोर्स है उनके लिए अप्लाई कर सकते है.


आईटीआई की पूरी जानकारी देने की कोशिश हम ने की है, फिर भी कोई सवाल हो तो आप कमेंट कर सकते है.